---Advertisement---

अड़ोलेशन्स चे डिजिटल प्रमाणपत्र मोबाइलवर वाटप

---Advertisement---

कोविड च्या काळात प्रथमच्या वतीने ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात आले. स्वतंत्रता दिवसाचे अवचित्य साधुन प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन च्या यूथनेट एंड अड़ोलेशन्स कार्यक्रमा अंतर्गत ऑनलाइन प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना मोबाइल वर डिजिटल प्रमाणपत्र ( स्किल पासपोर्ट सर्टिफिकेट ) देण्यात आले. ग्रामपंचायत मधील ग्रामसभा सगळीकड़े होत नसल्याने थेट मुलाना प्रसंगी कार्यक्रमाची माहिती आणि संकेतस्थळ भेट मोबाइल वर समजावुन सांगण्यात आली. तसेच कोर्स पूर्ण केलेल्या विद्यार्थीना बोलावून मोबाइल वरकार्यक्रमाचे संकेत स्थळ www.prathamyouthnet.org.in यावर जावून मुलांचे प्रोफाइल मधील स्किल पासपोर्ट वरील सर्टिफिकेट त्यांना प्रदान करण्यात आले. प्रसंगी प्रथमचे मेंटोर संजय कोरडे यानी आपल्या तालुक्यातीलच नाही तर यवतमाळ , वर्धा , चंद्रपुर आणि गडचिरोली मधील निवडक तालुक्यातील रीच झालेल्या संपूर्ण गावातील विद्यार्थ्याना या पद्धतिचे वितरण करण्यात येणार व प्रथमच्या या कार्यातुन मुलाना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी मिळू शकते असे सुद्धा मार्गदशनातून बोलत होते. राळेगांव आणि मारेगाव तालुक्यातील किमान ५० गावामध्ये हा उपक्रम राबवल्या जात असून गरजू युवक युवतीना प्रशिक्षण वा रोजगाराची संधी मिळवून देण्यास प्रथम कटीबद्ध असल्याचे कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून शक्य असल्याचे देखील बोलत होते. नव्याने सुरु होत असलेल्या बॅच मध्ये अशा गरजूवंत युवक युवतीना प्रवेश देने सुरु असल्याचे बोलत होते.

मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, क्रीडा, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा ऊद्देश आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Latest Stories

Leave a Comment