---Advertisement---

⚠️ मोहदा खदान विशेष : “सुरक्षा आहे कागदावर, धोका आहे प्रत्यक्षात!” ⚠️

---Advertisement---

मौजा मोहदा येथील गट क्रमांक 289 मध्ये सुरू असलेल्या बालाजी असोसिएट कंपनीच्या खाण व थ्रेशर कामामुळे परिसरात नवीनच “साहसी पर्यटन” सुरू झाल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये रंगली आहे. कारण शेतात जाण्यासाठी आता शेतकऱ्यांना सरळ रस्ता सोडून 120 फूट खोल खदानच्या कडेला संतुलन साधत प्रवास करावा लागत आहे.

पूर्वी शेतकऱ्यांसाठी असलेला बंडीचा पांदण रस्ता कंपनीच्या अतिक्रमणामुळे जणू इतिहासात जमा झाला आहे. कंपनी म्हणते “रस्ता नाही”, आणि शेतकरी म्हणतात “जीव आहे पण खात्री नाही”.

📸 छायाचित्रांनुसार परिस्थिती काहीशी अशी दिसते –
😐 खदान खोल आहे पण सुरक्षा व्यवस्था मात्र दिसत नाही
😐 रस्ता आहे पण तो धोक्याच्या अगदी कडेला
😐 सूचना फलक नाहीत, पण धोका मात्र मोठा आहे

दरम्यान, मोहदा ग्रामपंचायतीने कंपनीला NOC देताना अटी व शर्ती लावल्याचे सांगितले जाते. त्या अटींचे पालन होते की नाही हे मात्र कदाचित “गुप्त विभागा”त तपासले जात असावे, अशी ग्रामस्थांमध्ये मिश्किल चर्चा सुरू आहे.

विशेष म्हणजे, परिसरात थ्रेशर व खदान कामामुळे दुर्घटना व अपघातांच्या घटना वाढत असल्याची चर्चा होत असून अशा घटना शांतपणे “मिटवण्याची” परंपरा तयार होत असल्याचा आरोपही स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. अपघातापेक्षा त्याची चर्चा बाहेर जाऊ नये यावर अधिक लक्ष दिले जात असल्याचे ग्रामस्थ विनोदाने सांगताना दिसतात.

👉 प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करावी
👉 शेतकऱ्यांचा जुना रस्ता खुला करावा
👉 खदान परिसरात खरी सुरक्षा व्यवस्था करावी
👉 अपघातांच्या घटनांची पारदर्शक चौकशी करावी

“विकासाच्या” नावाखाली जीव धोक्यात घालण्याचा हा प्रयोग थांबवावा, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

मोहदा #खनन_वास्तव #शेतकरीप्रश्न #सुरक्षा

मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, क्रीडा, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा ऊद्देश आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment