---Advertisement---

सकाळी ८ वाजता बालाजी असोसिएट कंपनीचे जोरदार ब्लास्टिंग? 500 मीटर सुरक्षित अंतराच्या नियमाचे कथित उल्लंघन; मोहदा ग्रामस्थ संतप्त

---Advertisement---

मोहदा | प्रतिनिधी

मोहदा गावालगत कार्यरत असलेल्या बालाजी असोसिएट कंपनीकडून गौण खनिज उत्खनन करताना 500 मीटर सुरक्षित अंतराच्या नियमाचे कथित उल्लंघन करून मोठ्या प्रमाणात ड्रिलिंग व ब्लास्टिंग सुरू असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याचबरोबर कंपनीकडून नियमबाह्य पद्धतीने बेल्ट निर्माणाचे कामही सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

शनिवार (दि. 27 जून) रोजी सकाळी सुमारे 8 वाजताच्या सुमारास झालेल्या जोरदार ब्लास्टिंगमुळे मोहदा गावातील वार्ड क्रमांक 1 मधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, ब्लास्टिंगचे ठिकाण घरांच्या अत्यंत जवळ असून, उडणारे दगड अंगावर किंवा घरांवर येतील की काय, अशी भीती नागरिकांना सतावत आहे.

ग्रामस्थांचा आरोप आहे की, या कामात सहभागी असलेल्या ड्रिलिंग व ब्लास्टिंग करणाऱ्यांकडून नागरिकांच्या जीवित सुरक्षिततेपेक्षा व्यवसायाला प्राधान्य दिले जात आहे. वारंवार नियमांचे उल्लंघन होत असतानाही संबंधित यंत्रणा कारवाई करत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.

याच मुद्द्यावर पाच वर्षांपूर्वी आवाज उठवणारे आणि मोठमोठी आश्वासने देणारे पुढारी आज गप्प का आहेत? गावकऱ्यांच्या विश्वासाला तडा देऊन ते नेमके कुठे गेले, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

गावातील ग्रामपंचायत, प्रशासक आणि संबंधित विभागानेही या गंभीर प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. एखादी मोठी दुर्घटना घडून नागरिकांचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे.

ग्रामस्थांनी इशारा दिला आहे की, “गावकऱ्यांच्या जीवाची किंमत नसेल आणि गावातील काही व्यावसायिक गावाच्या सुरक्षिततेचा विचार करणार नसतील, तर आता नागरिकही शांत बसणार नाहीत. नियमबाह्य ड्रिलिंग, ब्लास्टिंग आणि कथित बेकायदेशीर कामांविरोधात तीव्र लोकआंदोलन छेडले जाईल.

“ग्रामस्थांच्या आज सकाळी झालेले ब्लास्टिंग इतके तीव्र होते की स्फोटानंतर मोठमोठे दगड चौफेर उंच उडाल्याचे दिसून आले. तसेच स्फोटाच्या तीव्र धक्क्यामुळे परिसरातील घरांना जबर हादरे बसले असून, काही घरांमध्ये भांडी खाली पडल्याचा प्रकार घडल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. या घटनेमुळे वार्ड क्रमांक १ मधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, भविष्यात मोठी जीवितहानी होण्याची शक्यता व्यक्त करत ग्रामस्थांनी तातडीने कारवाईची मागणी केली आहे.

मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, क्रीडा, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा ऊद्देश आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Latest Stories

Leave a Comment