---Advertisement---

“तरुणाईचा बुलंद आवाज! समीरजी लेनगुरे ठरले उ.बा.ठा पक्षाचे महाराष्ट्रातीलसर्वात कमी वयाचे युवासेना जिल्हाप्रमुख!” 🔥🚩दमदार वक्तृत्व, तडफदार नेतृत्वआणि शिवसेनेच्या विचारांचा बुलंद आवाज! ✨🚩🚩

---Advertisement---

वणी प्रतिनिधी:-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेना जिल्हाप्रमुख (वणी – आर्णी विधानसभा क्षेत्र) पदी समीरजी लेनगुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अवघ्या 26 व्या वर्षी ही महत्त्वाची जबाबदारी मिळाल्याने ते सर्वात तरुण शिवसैनिक म्हणून चर्चेत आले आहेत.

आपल्या ओजस्वी वक्तृत्वशैली, हिंदुत्ववादी विचारसरणी आणि समाजप्रबोधनाच्या कार्यामुळे समीरजी लेनगुरे यांनी संपूर्ण विदर्भासह महाराष्ट्रभर एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

शिवव्याख्याते, प्रबोधनकार तथा प्रभावी वक्ते म्हणून युवकांमध्ये त्यांची मोठी लोकप्रियता असून विविध सामाजिक, धार्मिक आणि जनजागृती कार्यक्रमांमधून त्यांनी तरुणाईपर्यंत शिवसेनेची विचारधारा प्रभावीपणे पोहोचवली आहे.

अत्यंत सामान्य आणि गरीब कुटुंबात वाढलेल्या समीरजी लेनगुरे यांनी संघर्षातून आपले स्थान निर्माण केले. प्रतिकूल परिस्थितीतही समाजकार्याची वाट न सोडता त्यांनी सातत्याने युवकांसाठी, सर्वसामान्य नागरिकांसाठी आणि अन्यायग्रस्तांच्या हक्कांसाठी आवाज उठवला. अन्यायाविरुद्ध बुलंद आवाज उठवण्याची त्यांची ताकद आणि समाजातील तळागाळातील लोकांशी असलेला संपर्क पाहता युवकांमध्ये त्यांच्याविषयी विशेष आकर्षण निर्माण झाले आहे.

त्यांच्या कार्याची दखल घेत शिवसेना उ.बा.ठा पक्षातील वणी विधानसभा क्षेत्राचे आदरणीय आमदार श्री. संजय भाऊ देरकर तसेच पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे पक्ष संघटना अधिक मजबूत होईल, तसेच मोठ्या संख्येने नवयुवक शिवसेनेशी जोडले जातील असा विश्वास पक्ष नेतृत्वाने व्यक्त केला आहे.पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत युवासेना अधिक बळकट करण्यासाठी आणि शिवसेनेची विचारधारा घराघरात पोहोचवण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करणार असल्याची भावना समीरजी लेनगुरे यांनी व्यक्त केली.

यावेळी पक्षातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक आणि समर्थकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, क्रीडा, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा ऊद्देश आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment