---Advertisement---

लीज संपून वर्ष उलटले तरी मोहदा येथील गट क्र. 283 मधील खदानीत पुन्हा ड्रिलिंग व उत्खनन? नागरिकांचा संतप्त सवाल – “नेमके कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे काम?”

---Advertisement---

वणी (प्रतिनिधी) –

वणी तालुक्यातील मौजा मोहदा येथील गट क्र. 283 मधील खदान परिसरात पुन्हा एकदा ड्रिलिंग व उत्खननाची कामे सुरू असल्याचे दि. 16 जुलै 2026 रोजी सायंकाळी GPS लोकेशनसह काढलेल्या छायाचित्रांमधून समोर आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. या छायाचित्रांमध्ये खाण परिसरात ड्रिलिंग मशीन, यंत्रसामग्री आणि धूर दिसून येत असल्याने परिसरात पुन्हा उत्खनन सुरू झाल्याची चर्चा आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या खदानाची लीज संपून एक वर्षाहून अधिक कालावधी झाला आहे. लीज संपल्यानंतर खदान आपोआप बंद होणे अपेक्षित असताना पुन्हा ड्रिलिंग व उत्खनन सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

यापूर्वीही या खदानात अनेक वेळा कथित अवैध उत्खनन व ब्लास्टिंग झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. काही महिन्यांपूर्वी खाणीत पोकलंड मशीन पडून मोठी दुर्घटना घडली होती. त्या घटनेनंतर काम काही काळ बंद होते; मात्र आता पुन्हा हालचाली सुरू झाल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.

वॉर्ड क्र. 1 पासून अवघ्या 200 मीटरवर खदानग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, ही खदान मोहदा गावातील वॉर्ड क्र. 1 पासून सुमारे 200 मीटर अंतरावर आहे. त्यामुळे सतत होणाऱ्या ड्रिलिंग व संभाव्य ब्लास्टिंगमुळे घरांना हादरे बसण्याची, तडे जाण्याची तसेच नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ग्रामस्थांचा सवाल आहे की, जर खदानाची लीज संपलेली असेल, तर पुन्हा ड्रिलिंग व उत्खनन कोणाच्या परवानगीने सुरू आहे? संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष का करत आहेत? तसेच ड्रिलिंग करणाऱ्या व्यावसायिकांनाही लीज संपल्याची माहिती असतानाही ते काम कोणत्या कायदेशीर आधारावर करत आहेत?

असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

प्रशासनाकडे तातडीच्या चौकशीची मागणीग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, खनिकर्म विभाग व DGMS यांनी संयुक्त पाहणी करून खदानाची लीज, उत्खननाची परवानगी, ड्रिलिंगची मंजुरी आणि इतर सर्व कागदपत्रांची पडताळणी करून नियमभंग आढळल्यास तात्काळ काम बंद करण्याची व संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

विशेष टीप

मोहदा गावातील नागरिकांचा असा सवाल आहे की, दि. 15 जून रोजी स्थानिक लोकप्रतिनिधींनी रस्त्यालगत सुरू असलेल्या एका कथित अवैध उत्खननाचा मुद्दा वृत्तपत्रातून उचलून धरला होता. मात्र, गट क्र. 283 मधील खदानीत गेल्या वर्षभरात अनेक वेळा कथित अवैध ड्रिलिंग व ब्लास्टिंग होत असल्याचा आरोप असूनही त्याकडे दुर्लक्ष का केले जात आहे?तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत प्रशासन आणि संबंधित शासकीय यंत्रणांना ही बाब दिसत नाही का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

“एका ठिकाणी अवैध उत्खननाविरोधात आवाज आणि दुसऱ्या ठिकाणी मौन का? एका खदानधारकावर कारवाईची मागणी आणि दुसऱ्याबाबत शांतता का? नेमके कोणाच्या आशीर्वादाने लीज संपल्यानंतरही हे काम सुरू आहे?” असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

टीप : या वृत्तातील आरोप व दावे हे ग्रामस्थांनी मांडलेल्या माहितीनुसार आहेत. संबंधित खदानधारक, लोकप्रतिनिधी किंवा शासकीय विभागांची भूमिका उपलब्ध झाल्यास तीही प्रसिद्ध करण्यात येईल. अंतिम वस्तुस्थिती संबंधित शासकीय चौकशीनंतर स्पष्ट होईल.

मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, क्रीडा, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा ऊद्देश आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment