---Advertisement---

ग्रामीण भागातील प्राथमिक शाळा सुरू करा ;

---Advertisement---

यवतमाळ : गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्य़ातील प्राथमिक शाळा बंद  आहे.कोरोनाची स्थिती आटोक्यात आल्यामुळे   माध्यमिक शाळा  नियमीत सुरू केल्या. मात्र वर्ग 1 ते 7 अद्याप ही बंद आहे.त्यामूळे ग्रामीण भागातील गरीब ,वंचित व बहुजन समाज घटकातील मुलांच्या शिक्षणावर सर्वाधिक वाईट परिणाम झालेला आहे .ग्रामीण भागातील 95टक्के घरी स्मार्ट फोन नाही. 5 टक्के फोन असलेल्यांजवळ रिचार्ज करण्यासाठी पैसे नाहीत. तर नेटची मोठी समस्या आहे. मुले केवळ कार्टून व गेम खेळतात .पालकांना मुलांच्या ऑनलाईन अभ्यासाकडे लक्ष देण्यासाठी वेळच नाही दिवसभर कामाला जावे लागते.त्यामूळे ग्रामीण भागातील मुले शैक्षणिक प्रवाहातून खूप दूर गेले.ग्रामीण भागातील प्राथमिक शाळा  सुरू कराव्यात या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देत निवेदन देण्यात आले.

मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, क्रीडा, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा ऊद्देश आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Latest Stories

Leave a Comment