---Advertisement---

उभ्या ट्रकवर दुचाकीची धडक आणी तो..

---Advertisement---

मारेगाव :- प्रतिनिधी
आपल्या गावाकडे परत जात असतांना रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या ट्रकवर दुचाकीने धडक दिली. या घटने जखमी झालेल्या युवकाचे नाव शुभम विठ्ठलराव करडभूजे अंदाजे वय २६ रा. बोटोनी असे आहे. सदर घटना दि.२१ एप्रिलला रात्री ८:३० च्या दरम्यान घडली . मध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून,त्याचेवर मारेगाव येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे हलवीण्यात आले आहे.

बोटोनी गावचा रहवासी शुभम वयक्तिक कामानिमित्त मारेगाव येथे गेला होता. तेथील काम आटोपुन तो आपल्या गावाला परत येत असताना करणवाडी जवळील पेट्रोल पंपासमोर उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडक दिली. यात दुचाकीस्वार चालक गंभीर जखमी झाला.

सदर घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या अपघाताचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, क्रीडा, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा ऊद्देश आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment