मारेगाव : अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर मंगळवारी (दि.६) महसूल पथकाने कारवाई केली. यावेळी कागदपत्रांमध्ये तफावत आढळल्याने महसूल पथकाने ट्रकसह वाळू जप्त केली.
अवैध वाळू वाहतुकीला आळा बसावा, यासाठी तहसीलदार उत्तम निलावाड स्वतः यांनी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी मागील काही दिवसांपासून कंबर कसली आहे. मंगळवारी गदाजीबोरी येथे तहसीलदारा सह कर्मचारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास ग्रस्त घालत होते. यावेळी वाळू मालवाहतुक करणारा ट्रक (क्र एम एच -३६-१६७५) पकडण्याचा प्रयत्न केला असता ट्रक न थांबता जाण्याचा प्रयत्न केला असल्याने ट्रकाचा पाठलाग करत महादापेठ येथे ट्रकला थांबविण्यात आले. यावेळी वाहन चालक याच्याकडे कागदपत्र्यांची चौकशी करण्यात आली. कागदपत्रांमध्ये तफावत आढळून आल्याने वाळूसह ट्रक ताब्यात घेऊन तहसिल कार्यालयाच्या आवारात लावण्यात आला असून. ही कारवाई तहसीलदार उत्तम निलावाड, नायब तहसीलदार अरूण भगत,मंडळधिकारी रघुनाथ कांडाळकर ,वाहन चालक विजय कनाके यांनी ही कारवाई केली.
Tags